रखरखती तप्त धरा, अन कमरेला पोर
चैताच्या या उन्हाला, आला आगीचा जोर....
रिकामीच घागर, पण डोळ्यातून पाणी
'घोटाच्या' शोधात, फिरे अनवाणी....
दिसेल का झरा? जरा अंधुकच आशा
उपाशी लेकुरवाळी, तिची का हि दशा?....
दैवरेखा या वेलीच्या अशा का रेखल्या?
फुल उमलण्याआधी पाकळ्याही सुकल्या....
फुल उमलण्याआधी पाकळ्याही सुकल्या....
हे पाण्याचे डबके, चल असुदे गढूळ
कितीतरी दिवसांची, भरून घे चूळ....
डुंबून घे आज, यातच मनसोक्त
तुझ्या आयुष्यात आहे,'वणवण'च फक्त....
हि कविता करण्यासाठी सौ.साधनाताई वर्मा यांच्या खालील कवितेची प्रेरणा घेतली आहे..
ReplyDeleteसूर्य तापलेला डोक्यावर
आणि कंबरेवर करकचून
बांधलेल पोर.
डोक्यावर घेतलेली घागर
नजरेतुन पाणी गालून
पिन्याच्या पान्याच्या
शोधात फिरतेय
सैर्वैर.........
कूठेतरी तीला
झरा दिसतोय
ते ही पानी
तीच्या आसवापेक्षा
गढ़ुल
कमरेच पोर सोडुंन
तेच गढ़ुल पानी
घागरीत भरूंन
पुन्हा निघाली
ती घराकड़े
तोच तो तलपनारा सूर्य
आनी तेच
गढूल आसवे घेऊन
---साधना वर्मा