Thursday, November 24, 2011

सूर मनीचे

सा'त सुरांची साथ घेउनी,
रे'खिले चित्र स्पष्ट बोलके.
ग'र्द रंग हे दिले उधळून,
म'नास देती माझ्या झोके.

प'कडला मी सूर असा कि,
ध'ग आगीची विझून गेली.
नि'राशता घेऊन मनीची,
सां'जवेळ ती झुकून गेली.
---अरुण झिंजुर्डे---
२५/११/२०११

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. ही कविता सौ.मंजुषा पवार यांच्या खालील चारोळीला comment देण्यासाठी केली आहे (on facebook)..(शिघ्रकविता आहे..)
    मंद संगीताच्या तालावर ..
    पहाटेच्या समयी रमले ...
    नैराश्य माझे कुठल्याकुठे ..
    गायबच झाले ...
    मंजुषा

    ReplyDelete